Mazi Ladki Bahin Yojana Rules : मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिणीसाठी सर्वात सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे. आता या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नियमात बदल झालेला आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणता बदल झालेला आहे हे समजून घेऊया.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी माहिती आहे, त्यामुळे माहिती संपूर्ण वाचा. कोणालाही पैसे मिळणार नाही, हे देखील समजून घ्या. त्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आणि सरकारकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्यानंतर या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.
Mazi Ladki Bahin Yojana Rules 2024
आता या ठिकाणी आतापर्यंत लाडक्या बहिणींना 5 हप्ते वितरित करण्यात आले आहे. हे तुम्हाला माहीतच असेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिलेले आहे. आता कोणत्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत हे देखील समजून घ्या.
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने काही नियम आणि पात्रतेचे निकष जाहीर केलेले आहेत. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य कर भरत असेल किंवा भारत सरकारच्या एका शासकीय विभागात नोकरी असेल तरी देखील लाभ मिळत नाही.
माझी लाडकी बहीण योजना कोण अपात्र ?
कुटुंबातील महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत, स्वतः महिला किंवा कुटुंबातील सदस्य एखाद्या सरकारी योजनेतून प्रत्येक महिन्याला बाराशे पन्नास रुपयांचं लाभ घेत असेल तर त्या कुटुंबातील महिलालाही या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार नाही. महिला किंवा तिचे कुटुंबातील एखादा सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या
एखाद्या बोर्ड निगम मंडळाच्या अध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल तर त्या महिलांना देखील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळत नाही. सोबतच ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 5 एकर पेक्षा जास्त शेती असेल अशा महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जात नाही यांना पैसे मिळणार नाही.
आता महिलांचे ऑनलाईन अर्ज सध्या बंद झालेले आहेत. अर्थातच लाडकी बहिणीच्या अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मागवण्यात आले होते. परंतु आता या ठिकाणी आचारसंहिता लागल्यामुळे अर्ज थांबवण्यात आलेले आहेत 15 ऑक्टोंबर ही शेवटची तारीख होती, आता या ठिकाणी सध्या कुठल्याही अर्ज सुरू नाही धन्यवाद.